चौकशीपासून प्रमाणपत्रापर्यंत, संपूर्ण संस्था एका सॉफ्टवेअरमध्ये

कम्प्युटर इन्स्टिट्यूट, क्लासेस आणि प्रशिक्षण संस्थांसाठी मराठी सॉफ्टवेअर. फॉलो-अप कॉल, प्रवेश, फी, बॅच, प्रमाणपत्र आणि विद्यार्थ्यांना WhatsApp संदेश, सगळे एकाच ठिकाणी.

  • 7 दिवस पूर्ण सुविधांसह मोफत
  • मराठी व English
  • ऑफिसमधील सर्व कॉम्प्युटरवर, लॉगिनसह
CallToClass डॅशबोर्ड: आज कोणाला फोन करायचा, प्रवेश रूपांतरण आणि फी आठवण
CallToClass डॅशबोर्ड: सकाळी उघडताच आजचे फॉलो-अप, प्रवेश आणि बाकी फी दिसते.

एका विद्यार्थ्याचा पूर्ण प्रवास, एकाच नोंदीत

पहिल्या फोनपासून प्रमाणपत्र हातात देईपर्यंत विद्यार्थ्याची सर्व माहिती एकमेकांशी जोडलेली राहते. पुन्हा पुन्हा तीच माहिती भरावी लागत नाही.

एकही चौकशी विसरली जाणार नाही

फोन किंवा प्रत्यक्ष आलेल्या प्रत्येक चौकशीची नोंद होते. पुढचा कॉल कधी करायचा ते ठरवले की त्या दिवशी नाव आपोआप यादीत येते.

  • रोजची "आज कोणाला फोन करायचा" यादी, मागील बाकी कॉलसह
  • प्रत्येक कॉलचा इतिहास, प्रतिसाद आणि पुढील कॉलची तारीख
  • आधी कोणता कम्प्युटर कोर्स केला व पुढे कोणता हवा, याची नोंद
  • समुपदेशकनिहाय काम आणि चौकशी ते प्रवेश रूपांतरणाचा आढावा
  • यादीतूनच थेट कॉल किंवा WhatsApp

रोज सकाळी विद्यार्थ्यांचे संदेश तयार

"आजचे संदेश" यादीत कोणाला कोणता संदेश पाठवायचा ते सॉफ्टवेअर स्वतः तयार ठेवते. स्टाफने फक्त WhatsApp उघडून Send दाबायचे.

  • वाढदिवसाच्या शुभेच्छा, फी आठवण, नवीन चौकशीचे स्वागत
  • प्रवेश निश्चित, बॅच सुरू होण्याची आठवण, प्रमाणपत्र तयार
  • संदेशांचा मजकूर तुमच्या पद्धतीने बदलता येतो
  • महागड्या WhatsApp API ची गरज नाही
आजचे संदेश उदाहरण
वाढदिवस शुभेच्छाप्रिय विद्यार्थी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
पाठवा
फी आठवणतुमच्या कोर्सचा पुढील हप्ता बाकी आहे.
पाठवा
चौकशीचे स्वागतआमच्या संस्थेत चौकशी केल्याबद्दल धन्यवाद.
पाठवा
प्रमाणपत्र तयारअभिनंदन! तुमचे प्रमाणपत्र तयार आहे.
पाठवा

ऑफिसच्या रोजच्या कामासाठी

सर्व कॉम्प्युटरवर

एका मुख्य कॉम्प्युटरवर सर्व्हर, आणि ऑफिसच्या नेटवर्कवरील सर्व कॉम्प्युटरवर वापर.

लॉगिन व अधिकार

प्रत्येक स्टाफला स्वतःचे लॉगिन. Excel व सेटिंग फक्त Admin ला.

रोज आपोआप बॅकअप

फोटो व सहीसह पूर्ण बॅकअप दररोज, आणि Google Drive वर दुसरी प्रत.

रिपोर्ट व Excel

विद्यार्थी, प्रवेश, फी व कॉलची माहिती Excel मध्ये.

तुमच्या संस्थेचे नाव व लोगो

फॉर्म, पावती आणि प्रमाणपत्रावर तुमचीच ओळख.

मराठी व English

एका क्लिकवर भाषा बदला.

CallToClass डाउनलोड करा

आवृत्ती 4.5Windows साठीसुमारे 12 MB

Setup इन्स्टॉल करा, संस्थेचे नाव व लोगो भरा आणि लगेच वापर सुरू करा. पहिले 7 दिवस सर्व सुविधा मोफत.

Windows "Windows protected your PC" असा संदेश दाखवू शकते. तेव्हा "More info" आणि नंतर "Run anyway" दाबा. Setup फक्त या वेबसाइटवरूनच डाउनलोड करा.

किंमत

संस्थेनुसार

वार्षिक लायसन्स. तुमच्या संस्थेची गरज समजून घेऊन किंमत सांगितली जाईल.

  • इन्स्टॉलेशन व सुरुवातीचे प्रशिक्षण
  • फोन व WhatsApp सपोर्ट
  • नवीन आवृत्तीचे अपडेट
किंमत विचारा: 9421244245

नेहमीचे प्रश्न

इंटरनेट लागते का?

रोजच्या कामासाठी नाही. सॉफ्टवेअर तुमच्या ऑफिसच्या नेटवर्कवर चालते. WhatsApp संदेश पाठवण्यासाठी आणि Google Drive बॅकअपसाठीच इंटरनेट लागते.

किती कॉम्प्युटरवर वापरता येईल?

एका कॉम्प्युटरवर सर्व्हर चालतो. ऑफिसच्या नेटवर्कवरील इतर सर्व कॉम्प्युटरवर प्रत्येक स्टाफ स्वतःच्या लॉगिनने वापरू शकतो.

आमची माहिती सुरक्षित राहील का?

सर्व माहिती तुमच्याच कॉम्प्युटरवर राहते, बाहेरच्या सर्व्हरवर जात नाही. दररोज आपोआप पूर्ण बॅकअप होतो आणि मागील 30 दिवसांचे बॅकअप ठेवले जातात. Google Drive वर दुसरी प्रत ठेवण्याची सोय आहे.

मोफत ट्रायल कसे चालते?

Setup इन्स्टॉल केल्यावर 7 दिवस सर्व सुविधा मोफत वापरता येतात. पुढे वापरायचे असल्यास लायसन्स की दिली जाते. ट्रायलमध्ये भरलेली माहिती तशीच राहते.

आमच्या संस्थेचे नाव व लोगो येईल का?

हो. पहिल्यांदा सुरू करताना संस्थेचे नाव, पत्ता व लोगो भरा. ते डॅशबोर्ड, प्रवेश फॉर्म, पावती आणि प्रमाणपत्रावर दिसतात.

जुनी माहिती Excel मध्ये मिळेल का?

हो. विद्यार्थी, प्रवेश, फी आणि कॉलची माहिती Excel मध्ये काढता येते.

तुमच्या संस्थेसाठी डेमो पाहा

फोन करा किंवा फॉर्म भरा. सॉफ्टवेअर प्रत्यक्ष चालवून दाखवले जाईल.

मोफत डेमो फॉर्म

बटण दाबल्यावर तुमची माहिती भरलेला WhatsApp संदेश उघडेल. तो तपासून Send करा. ही वेबसाइट कोणतीही माहिती साठवत नाही.